सातारा प्रतिनिधी.
सध्या लोकसभेचे वातावरण सगळीकडे तापायला लागलेले आहे.
अशा मध्ये सातारा जिल्ह्याची निवडणूक उभा महाराष्ट्र गाजवणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी च्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची पूर्ण देशामध्ये चर्चा आहे. महायुती मधून भा.ज.प कडून मा .छत्रपती उदयन महाराज भोसले यांना उमेदवारी दिली आहे. छत्रपती.उदयन महाराज हे सातारा जिल्ह्यामध्ये सर्व घटकात व सर्व धर्मीय त्यांचा मानसन्मान करतात.युवा पिढीमध्ये ते अधिक प्रसिद्ध आहे.
याविरुद्ध महाविकास आघाडी मा .शरद पवार (साहेब) यांच्या कडून मा .शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.
सातारा जिल्ह्यामध्ये ही निवडणूक काट्याची होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सातारा जिल्ह्या मधील मतदार कोणाला झुकते माप देणार?
सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार का?
की केंद्रामध्ये कोणाची सरकार असली पाहिजे यावर मतदान होणार ?
हे सर्व जनतेवर अवलंबून आहे एकीकडे छत्रपती. उदयन महाराजांची पसंती तर दुसरीकडे मा.शरद पवार (साहेब) यांची रणनीती काय असणार ? हे सर्व पाहण्यासाठी सातारा जिल्ह्या मधीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्र मधील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
0 Comments