प्रतिनिधी नौशाद सय्यद
पाचगणी-- मौजे गोडवली येथे प्लॉट नंबर १२१/२ या ठिकाणी राहणारे कुटुंब भीतीच्या छाये मध्ये जगत आहे.
साजिद सलीम शिकलगार, जमीर अत्तार मुजफ्फर शिकलगार, अल्ताफ शेख हे सर्व कुटुंब सहपरिवार सहित या ठिकाणी राहत असून अनेक दिवसांपासून वरील भागामध्ये खाजाभाई कॉन्ट्रॅक्टर याचे मालकीचे वास्तु असून यांना अनेक वेळा कल्पना देऊन देखील हे निष्काळजी पणे वागत असल्याचे दिसून आले या संदर्भात आम्ही गोडवली ग्रामपंचायत मध्ये तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप करण्यात येत नाही. पाचगणी महाबळेश्वर तसेच परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या वास्तूची ताल केव्हाही पडू शकते तसेच त्यांचे इथून येणारे सांडपाणी हे सुद्धा आमच्या घरामध्ये व घराच्या आसपास आल्याने आजूबाजूच्या तसेच आमच्या परिवारातील सदस्यांना आजाराला सामोरे जावे लागत आहे.
तसेच दोन-तीन वेळा त्या ठिकाणी सांडपाणी तसेच घाण साचल्याने विषारी साप त्या ठिकाणी सापडले आहे.
वयाचा पुरावा म्हणून त्यावेळी व्हिडिओ सुद्धा आमच्याकडून काढण्यात आलेले आहेत. या कारणामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण आहे
त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता गोडवली ग्रामपंचायत ने तात्काळ याविषयी मध्ये लक्ष देत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावे अशी अशी मागणी व व्यथा संघर्ष महाराष्ट्र न्यूज चैनल समोर त्या ठिकाणी राहणाऱ्या पीडितांन
मांडले.
0 Comments