Header Ads Widget

मला महायुतीची उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे - मा.पुरुषोत्तम जाधव.

सातारा.प्रतिनिधी नौशाद सय्यद.

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरू आहे. यामध्येच गेल्या पंचवार्षिक मध्ये राज्याचे हॉटस्पॉट ठरलेली लोकसभा म्हणजे सातारा लोकसभा
 मा.नरेंद्र मोदी पासून ते मा. शरद पवार यांनी या जिल्ह्यात आपल्या सभा गाजवल्या यातील मा. शरद पवार यांची पावसातली सभा पूर्ण महाराष्ट्र गाजली.
त्यामुळे यावेळी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ही लोकसभा वेधून घेत आहे.
 सातारा जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असले तरी महायुतीच्या उमेदवारांची नावे मात्र अजून गुलदस्त्यामध्येच आहेत त्यामुळे जनतेत अनेक नावांचे चर्चा सुरू आहे त्यामधील लोकांच्या जनसंपर्कतातील एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख माननीय.पुरुषोत्तम जाधव यांनी वेळोवेळी 
आपण ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्याचे व्यक्त केले आहे .
गेल्या पंचवार्षिक पासून जनतेमध्ये वारंवार जाऊन जनतेच्या अडचणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न ते करत आले आहेत.
तसेच त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आता सुद्धा सर्व नेत्याच्या व जनतेच्या संपर्कात आहेत.  
त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले मला उमेदवारी नक्की मिळेल ही आशा मी आता देखील सोडलेली नाही.
 ते त्यांच्या पक्षामधील नेत्यांच्या संपर्कात असून जनते मधून ग्राउंड लेव्हल ला जन संपर्क वाढवलेला दिसून येतो.
 जनते मधून देखील त्यांच्या नावा ला प्रसिद्धी आहे.
त्यांच्याशी बोलताना ते पुढे म्हणाले मी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला आज पर्यंत धावून गेलो आहे त्यामुळे माझ्या केलेल्या कामाची पोचपावती मला पक्षश्रेष्ठी कडून तसेच जनतेकडून नक्कीच मिळेल.
 त्यामुळे मला आशा आहे की पक्षश्रेष्ठी नक्कीच माझ्या कामाचा विचार करत मला उमेदवारी जाहीर करतील.

Post a Comment

0 Comments