वाई प्रतिनिधी- आशिष चव्हाण.
वाई येथे वीज चोरीप्रकरणी एकावर महावितरणकडून कारवाई करण्यात आली असुन वाई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथे गाढवे डेअरी येथे महावितरणच्या अधिकारी वर्षा गायकवाड यांनी सहकाऱ्यांसोबत छापा मारून वीज चोरी उघडकीस आणली.
याप्रकरणी तानाजी शंकर गाढवे यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वीजचोरीची रक्कम ७ लाख ४२ हजार ८२० रुपये व तडजोड रक्कम ४ लाख ५० हजार रुपयेची बिले विद्युत वितरण कंपनीने त्यांना दिली होती. मात्र त्यांनी ती न भरल्याने भारतीय विद्युत कायद्यांतर्गत वीज मीटरला सील लावून पुढील कारवाई करण्यात आली.
0 Comments