वाई प्रतिनिधी, दिलीप कांबळे.
बावधन गावचा आदर्श प्रेरणादायी - बाळासाहेब भालचिम
वाई तालुक्यातील बावधन सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या मानाने भांडण तंट्याचे प्रमाण अल्प वाटते निवडणूक जत्रेच्या काळातही शांततेने संयमाने कार्यक्रम पार होताना दिसतात तंटामुक्त समिती ग्रामस्थ व विविध संस्थांच्या सहकार्याने चांगले काम करताना दिसते बावधन गावाचा आदर्श प्रेरणादायी असे उद्गार वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी काढले बावधन तंटामुक्त समितीच्या वतीने वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे वाई पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी व बिट हवालदार मदन वरखडे यांचा सत्कार समारंभ वाई येथे आयोजित केला असता भालचिम साहेब बोलत होते मी गावाचा नावलौकिक ऐकून होतो लोकसंख्या मोठी असल्याने तक्रारी वाढती असतील अशी शंका होती पण इथे आल्यावर आजपर्यंत किरकोळ तक्रारी वगळता दखल घ्यावी अशी मोठी घटना निदर्शनात आल्या नाहीत याचे कौतुक वाटते पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे म्हणाले गावच्या तुलनेने तक्रारी फारशा जाणवल्या नाहीत गावाला बिट हवालदार वरखडे हे खेळीमेळीच्या वातावरणात तक्रारदार जनतेला दिलासा देऊन सामंजस्याने प्रकरणे हाताळतात तंटामुक्त समितीचे कार्य कौतुकास्पद आहे यावेळी तंटासमुक्त समितीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम यांनी तंटामुक्त समितीच्या कार्याविषयी सखोल माहिती देऊन गावातील विविध पक्षाचे कार्यकर्ते मंडळी ग्रामपंचायत विविध संस्था व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले त्या प्रेरणेतूनच वर्षभरात तक्रारी सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामस्थांचा सन्मान केला यावेळी पोलीस पाटील अश्विनी हावरे सोसायटीचे माजी अध्यक्ष धनंजय पिसाळ पत्रकार दिलीप कांबळे शशी बाबा पिसाळ विक्रम पिसाळ विनायक तांबवे शशिकांत चव्हाण अनिश इनामदार संतोष हावरे , बाळासाहेब कांबळे, रवी तात्या शिंदे ,सुभाष भोसले ,मदन ननावरे,बाळकृष्ण पिसाळ उपस्थित होते.
0 Comments