दिलीप कांबळे पत्रकार बावधन, वाई
तंटामुक्त समितीने बावधन जनता सहाय्यक मंडळाच्या कार्याला उजाळा दिला - रवींद्र आप्पा पिसाळ*
बावधन जनता सहाय्यक मंडळ मुंबई या मंडळाने गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केला त्या काळात काबाडकष्ट करून उभारलेल्या निधीतून जत्रा शाळा छोट्या मोठ्या कामांना मदतीचा मोठा हातभार लावला 1963 ला स्थापन झालेल्या बावधन जनता सहाय्यक मंडळाने गावासाठी केलेल्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी तंटामुक्त समितीने मंडळाच्या संस्थापक वारसांचा सन्मान करून मंडळाच्या कार्याला उजाळा दिला असे गौरव उद्गार जनता सहाय्यक मंडळाचे सचिव रवींद्र आप्पा पिसाळ यांनी काढले बावधन तंटामुक्त समितीच्या शेवटच्या समारोप बैठक प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बावधन जनता सहाय्यक मंडळाच्या संस्थापक सभासद्व वारसांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी शाल पुष्पगुच्छ पेढे भरून सभासदांचा सन्मान केला त्यात जनता सहाय्यक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रमेश सखाराम पिसाळ , श्रीरंग आबा ननावरे ,सुधाकर माधवराव भोसले , भास्कर केरू कुंभार , बाळासाहेब रमेश पिसाळ , शंकरराव पारटे , केशव जायकर, बाळासाहेब मारुती ढेबे, किसन दगडू भोसले , आत्माराम दगडू तांबे मुस्तफा निजाम इनामदार या सभासदासह रवींद्र राजाराम पिसाळ विश्वनाथ राजाराम पिसाळ बाळासो विठ्ठल शिंदे रमेश सखाराम पिसाळ उत्तम मारुती पिसाळ सतीश गुलाबराव कदम रामभाऊ शिवराम कुंभार संपत बापूराव पिसाळ दत्तू लक्ष्मण पिसाळ प्रल्हाद दत्तू वीरकर अरविंद पिसाळ पाटील शिवाजी पिसाळ पाटील हरिचंद्र रामचंद्र भोसले अनिल सुभानराव भोसले अशोक गुलाबराव भोसले विजय शिवाजी पिसाळ सुरेश उल्हासराव पिसाळ मारुती जगन्नाथ दाभाडे बाळकृष्ण शंकर पिसाळ चंद्रशेखर संपत कदम विलास राजाराम कांबळे राजकुमार श्रीरंग जगताप ज्ञानोबा रामू तांबे विजय आप्पासाहेब पिसाळ दत्तात्रय सखाराम रासकर नरेंद्र भिकू जाधव बाळकृष्ण कोंडीराम कदम राजेश बाळकृष्ण कदम या सदस्यांचा सन्मान करण्यात आला तसेच राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सिद्धार्थ तानाजी कचरे सुवर्णपदक मयूर संदीप मांढरे सुवर्णपदक ओंकार किसन पिसाळ सुवर्णपदक सना वजीर शेख सुवर्णपदक मिळवून आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यांचा व मुख्य प्रशिक्षक वजीर अल्लाउद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अशोक भोसले पोलीस पाटील म्हणाले जनता सहाय्यक मंडळाने गावाच्या भल्यासाठी सातत्याने प्रयत्न केला घामाच्या पैशातून मोत्यासारखा विकास केला जनता सहाय्यक मंडळाने सत्काराची प्रथा चालू केली तीच पुढे तंटामुक्तीने चालू केल्याने जनता सहाय्यक मंडळाची आठवण येते यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे बाळासाहेब शिंदे यांची भाषणे झाली प्रास्ताविक सूत्रसंचालन नारायण शिंदे गुरुजींनी केले कार्यक्रमास माजी सरपंच प्रकाश नाना पिसाळ विवेक भोसले रमेश सखाराम पिसाळ संदीप पिसाळ यांच्यासह तंटामुक्त समितीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते स्वागत विक्रम पिसाळ यांनी केले आभार संतोष हावरे यांनी मानले दिवंगत संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
0 Comments