प्रतिनिधी
सातारा जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश असून देखील पर्यटका कडूननिष्काळजी पणा काळजी जिल्ह्यातील ठोसेघर बोरणे घाटात सेल्फी काढताना पडली मुलगी......
ग्रामस्थ व रेस्क्यूस टीम काढले सुखरूप बाहेर..
सविस्तर वृत्त.....
सातारा जिल्ह्यातील सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती दरीत कोसळली सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरा नजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यूस टीम व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले तिला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर समाधान काकडे रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडवे व सागर मदने तातडीने घटनास्थळी दाखल झाले खोल दरी मध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूप बाहेर काढले उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले घाटातील प्रवासांनी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असे आव्हान सातारा पोलीस स्टेशनचे निलेश तांबे यांनी केले.
0 Comments