आज दिनांक ३१-०५-२०२४ रोजी पाचगणी मधील पंचतारांकित हॉटेल ग्रँड विक्टोरिया (द फर्न) वरती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व उपस्थितीमध्ये पाचगणीचे मुख्याधिकारी मा. निखिल जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हे हॉटेल सिल केले.
हे हॉटेल सील करण्याचे कारण म्हणजे अनाधिकृत बांधकाम असलेल्या या हॉटेलला वारंवार नगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आले होते परंतु या नोटिसांना हॉटेल मालकांकडून केराची टोपली दाखवण्यात येत होती या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडून धडक भूमिका घेत कारवाई आज अखेर करण्यात आली. परंतु हे हॉटेल अनाधिकृत आहे तसेच या मिळकतीच्या मालकांमधील एक मालक हा मुंबई ९३ च्या बॉम्बस्फोटामधील आरोपी आहे अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून वारंवार नगरपालिकेकडे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येत होती मात्र कोणती कारवाई दिसून न आल्याने अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने या पंचतारांकित हॉटेल समोर मंडप टाकून दि.०७ नोव्हेंबर २०२३ रोजी घंटा नाद, आंदोलन करण्यात आले परंतु काही वेळही आंदोलन सुरू ठेवून देखील या आंदोलनाला प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने तेथील कार्यकर्त्यांनी आंदोलनाची दिशा बदलत अर्ध नग्न आंदोलन सुरू केले यावेळी हे आंदोलन पुढे वेगळ्या टोकाला जाऊ शकते याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी जागेवर पाचगणीचे मुख्याधिकारी मा. निखिल जाधव हे उपस्थित झालेत आणि मुख्याधिकारी यांच्याकडून आश्वासन देण्यात आले की चौकशी पूर्ण करून लवकरच आम्ही या हॉटेलवर कारवाई करू.
या आश्वासनानंतर तसेच विनंती नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. अशोकबापू गायकवाड. यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मा. जॉन जोसेफ तसेच महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष यांच्या कडून वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा करण्यात येत होता.
यावेळी तालुक्यातील रिपाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना ते म्हणाले
केलेल्या आंदोलनाला आज अखेर ६ महिन्यानंतर न्याय मिळाला. परंतू पैशाच्या जोरावर पाचगणी महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य पायदळीस तुडवणाऱ्या धन दांडग्यांना या प्रकरणानंतर धडा मिळेल अशी अपेक्षा आहे.
कारवाई करण्यात वेळ लागला असला तरी कारवाई झाली याचे समाधान आहे.
या घेतलेल्या निर्णयाचा पक्षाकडून माननीय. सातारा जिल्हाधिकारी व पाचगणी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0 Comments