Header Ads Widget

R.P.I(आठवले गट) पाचगणी शहर प्रभारी महिला अध्यक्षपदी मा. प्रीती आंब्राळे.

प्रतिनिधी. नौशाद सय्यद. 

दिनांक. ३०-०५-२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पाचगणी
 महिला प्रभारी शहराध्यक्ष म्हणून सौ. प्रीती आंब्राळे यांची निवड महाबळेश्वर तालुकाध्यक्ष. माननीय. जॉन जोसेफ, तसेच महाबळेश्वर तालुका कार्याध्यक्ष. माननीय. अतिश (पप्पू) भोसले यांच्याकडून करण्यात आली. समाजातील सर्व लोकांच्या अडीअडचणी तसेच न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर राहून त्यांच्या वेळेला हजर राहत आपली सामाजिक बांधिलकी पार पाडेल अशी ग्वाही यावेळी प्रभारी महिला शहराध्यक्ष सौ.प्रीती आबाळे यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय सेनेचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष माननीय. संतोष भाऊ कदम, माननीय. अभिनय माने तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments