वाई प्रतिनिधी- आशिष चव्हाण.
शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका विवाहितेने भुईंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० मे २०२३ ते दि. ९ सप्टेंबर २०२३ दरम्यान पती-सचिन धायगुडे, सासरे-नाना धायगुडे, सासू-छाया धायगुडे, नणंद-स्वाती धायगुडे सर्व रा. मरीआईचीवाडी, ता. खंडाळा यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक व शारीरिक त्रास देऊन मारहाण केली. तसेच मोबाईल घेण्यासाठी व विहीर खोदण्यासाठी माहेरहून २ लाख २५ हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यासाठी नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. त्याप्रकरणी त्या विवाहितेने चौघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार वैशाली फरांदे करत आहेत.
0 Comments