Header Ads Widget

दिपा चंद्रकांत गांगुर्डे"महाराष्ट्राची हिरकणी२०२४पुरस्काराने"सन्मानित

 


--कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)-८मार्च हा जागतिक महिला दिन,याच महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील सुनिर्मल फाऊंडेशनने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या महाराष्ट्राची हिरकणी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याचवेळी कल्याण येथील राईट्स ऑफ वुमेन फाऊंडेशनच्या संचालिका दिपा चंद्रकांत गांगुर्डे यांना"महाराष्ट्राची हिरकणी२०२४पुरस्काराने"प्रमुख पाहुण्यांचा हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.हा कार्यक्रम दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दिपा चंद्रकांत गांगुर्डे या राईट्स ऑफ वुमेन फाऊंडेशन अंतर्गत'आईची सावली बालभवन हा बालकाश्रम चालवत आहेत.वंचित व निराधार,गरीब मुला मुलींचे त्या संगोपन करत आहेत.दिपा गांगुर्डे या इतरही समाजकार्यात अग्रेसर आहेत.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानपत्र,प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवांकीत करण्यात आले आहे.कल्याण येथील इतरही सामाजिक संस्थेशी दिपा चंद्रकांत गांगुर्डे यांचे घनिष्ठ संबंध आहेत.सुनिर्मल फाऊंडेशनचा"महाराष्ट्राची हिरकणी२०२४"हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिपा चंद्रकांत गांगुर्डे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments