पाचगणी प्रतिनिधी. नौशाद सय्यद
माध्यमिक शाळात परीक्षेत पाचगणी मधील हॅपी आवर्स स्कूल ने दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा राखत यावर्षी सुद्धा दहावी मध्ये शंभर टक्के निकाल दिला आहे. यावेळी ऋषिकेश ढेबे याने ८७% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तसेच हिबा काश्मी हिने ८५.६०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला तर आदित्य खंडागळे याने ८४.६०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळाला.
त्यामुळे संपूर्ण पाचगणीतून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. स्कूलचे मुख्याध्यापक माननीय. नितीन प्रभाळे, तसेच शाळेचे ट्रस्टी, व कर्मचारी यांच्याकडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments