Header Ads Widget

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगीनादसह बोंबाबोब आंदोलन.

प्रतिनिधी:- नौशाद सय्यद

मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मंगळवार 25 जून रोजी अकलूजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हलगीनादसह बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.मागण्यांमध्ये अकलूज पोलीस स्टेशनअंतर्गत ऑनलाइन भिंगरी जुगार खेळण्याचे युवकांना व्यसन लावून त्यांच्याकडील सर्व पैसे लुटून युवकांना कर्जबाजारी करून बरीच कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत सदरचा ऑनलाइन भिंगरी जुगार काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच अकलूज पोलीस स्टेशनअंतर्गत राजरोसपणे चालविला जातो सदरचा ऑनलाइन भिंगरी जुगार चालवण्यासाठी कोण्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच स्वतःचा आयडी दिल्याचे समजते आहे या ऑनलाइन भिंगरी जुगारामधून दररोज लाखो रुपयाची उलाढाल होऊन मोठ्या प्रमाणात पैसे लुटले जात आहेत तसेच अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत गाडी चोरांसह दुकान फोडून सामान चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यास गेलेल्या नागरिकांना ऑनलाइन व नेटचा प्रॉब्लेम सांगून तीन ते चार तास अडवून ठेवले जाते अकलूज शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा राजरोसपणे विकला जातो या सर्व प्रकाराची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करा राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत केलेले बदल रद्द करून योजनेच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवाव्यात 302 307 सह अनेक कलमे इतिहास जमा करून भारतीय दंड संहिता ऐवजी भारतीय न्याय संहिताची कलमे लागू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे अकलूज माळेवाडी नगरपरिषद अंतर्गत केलेल्या सर्व प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या विकास कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल चौकशी व लेखापरीक्षण करून सदर ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करून यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून निकृष्ट दर्जाची विकासकामे पुन्हा नव्याने करून द्यावीत कोविड काळामध्ये महाराष्ट्र शासनाने कंत्राटी स्वरूपात विविध पदांची भरती प्रक्रिया केली होती त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची परवा न करता रुग्णसेवेसाठी योगदान दिले होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा वैद्यकीय अधीक्षक माळशिरस यांच्यामार्फत अकलूज क्रिटीकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची चौकशी करण्यात आली होती त्या चौकशी अहवालानुसार अकलूज क्रिटिकल केअर हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करावी अकलूज शहरातील राणे नर्सिंग होम या हॉस्पिटलला नवजात शिशु व बाल रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची त्वरित मान्यता देऊन माढा माळशिरस इंदापूर व सांगोला या चार तालुक्यातील गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय दूर करून त्यांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर करावा माळशिरस तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची अवैधरित्या नियुक्ती करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे लेखापरीक्षण करून यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून नवीन माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी माळशिरस तालुक्यातील खराब झालेले सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करावेत नवीन अस्तित्वात येणाऱ्या कामगार कायद्यास आमचा तीव्र विरोध असून जुन्या कामगार कायद्याचीच अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले आजचे आंदोलन करूनही आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांना दिला.
यावेळी या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे चळवळीचे सहकारी विजय बनसोडे सरवदे रिपाई आठवले गटाचे युवा नेते रविराज बनसोडे वंचितचे युवानेते प्रदीप सरवदे यांनी भेट दिली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे पुणे जिल्हा युवक प्रवक्ता ऋषिकेश दळवी पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव शेतकरी संघटनेचे नेते शिवराम गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष सदानंद बनसोडे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सहसंघटक मिलिंद चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका खजिनदार विश्वास उगाडे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका सरचिटणीस तुषार केंगार तालुका युवक संघटक कबीर मुलानी अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी रवी कोळी अर्जुन कोळी वैभव आंबुरे जगु कोळी सागर कोळी अजय साळुंखे बाबासाहेब ननवरे अरुण कोळी विकास गावंडे अभिषेक शिंदे अनिकेत शिंदे पप्पू लोखंडे राजाभाऊ जाधव गणेश गुजणे शिवाजी कांबळे संतोष पवार आरिफ सय्यद अर्जुन जाधव मन्सूर काजी अभिषेक पवार सचिन कसबे मच्छिंद्र काटे पप्पू जगताप रामहरी जाधव संतोष वाघमारे मंडाबाई गायकवाड बाळाबाई लोंढे मीरा बोरकर फुलाबाई कोळी रेखा मंजुळकर अनिता दारोडकर उषा मंजुळकर उज्वला चौगुले आसमा तांबोळी मनीषा जगताप ललिता चौगुले स्वाती चौगुले अलका वाघमारे यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments