Header Ads Widget

महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचा २९ वा वर्धापन दिन पाचगणी मध्ये उत्साहात साजरा.

प्रतिनिधी नौशाद सय्यद 

म.प्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचा २९ वा वर्धापन दिन पाचगणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे उत्साहात साजरा..
मा.लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी म. प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाची स्थापना ७ जून १९९५ रोजी पुणे येथे केली त्याला आज २९ वर्षे पूर्ण होत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून, सर्वांच्या समवेत केक कापून तसेच मधुर, स्वादिष्ट पदार्थ वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
झोपडीत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांचे मतदान करण्या पुरता प्रस्थापित राजकीय नेत्यांनी वापर केला आहे. आणि त्या घटकांना विकासापासून कोसो दूर नेऊन ठेवले परिणामी ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी अशिक्षित, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अस्तिर, भकास, अंधारमय जीवन  जगत आहे. म.प्र झोपडपट्टी सुरक्षा दलाची स्थापना झाल्यापासून साहेबांनी ज्या ठिकाणी म.प्र झोपडपट्टी सुरक्षा दलाची शाखा आहे तेथील झोपडपट्टी वासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. झोपडीत राहणारा घटक व्यावसायिक बाबतीत सक्षम व्हावा यासाठी विविध राज्यातील महामंडळे असतील किंवा पंतप्रधान मुद्रा योजनेतून हजारो लाखो कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम साहेबांनी केले. 
भूमिहीन लोकांना घरे शेती मिळवून त्यांचे जीवन स्थिर केले. शैक्षणिक योजना तळागाळापर्यंत राबवून वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केलं. विविध शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष लक्ष दिल. साहेबांनी एक ना अनेक कामे जनतेला केंद्रबिंदू मानून  लोक कल्याणकारी कार्य केले आहे असे म. प्र दलित विकास आघाडी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष श्री.अभिजीत (सनी) ननावरे यांनी व्यक्त केले. श्री.वैजनाथ प्रभाळे म्हटले मा.लोकनेते वैराट साहेब हे बहुजन वर्गाचे नेते असून त्यांनी सर्वांसाठी मोलाचे काम केले आहे. याप्रसंगी "हमारी झोपडी हमारी ताकद" हा नारा देण्यात आला
यावेळी सिद्धार्थ घाडगे, संतोष मोहिते, लक्ष्मीताई मोहिते, भारती कांबळे, पूजा ननावरे, लक्ष्मी (काकू) मोहिते, रामभाऊ नेटके, दिव्या मोहिते, श्रुती माने, छाया खुडे, मीना नेटके, प्रशांत मोहिते, हर्ष खुडे, आश्लेष खुडे, शुभम ननावरे, इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments