Header Ads Widget

सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदी मा. रामदासजी आठवले साहेब.

प्रतिनिधी नौशाद सय्यद 

काल झालेल्या मंत्री पद शपथविधी समारंभ मध्ये पहिल्या टप्प्यात माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकार शपथविधी मध्ये मागील दोन टर्म प्रमाणे यावेळी सुद्धा माननीय रामदास आठवले साहेब यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी वरणी लागली.
भल्या भल्यांना मंत्री पदासाठी जिथे चांगलीच कसरत करावी लागते तिथे माननीय आठवले साहेब सहज केंद्रातून मंत्रीपद खेचून आणतात. 
अशी चर्चा पूर्ण भारतभर ऐकाय मिळते. 
आपल्या शीघ्र कवी शैलीतून वारंवार मीडियामध्ये आपली उपस्थिती नोंदवणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्यांचे असणारे मैत्रीचे संबंध याच्यावर त्यांना मंत्रिपद आणणे सोपे पडते हे जरी चर्चेमध्ये असले तरी त्यांची दुसरी बाजू नाकारता येणार नाही आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे गाव वाडी वस्ती पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देणे तसेच अन्यायाविरुद्ध वारंवार लढा देणे. 
तसेच कोणत्या कामामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकत कशी वाढेल यावर पूर्ण लक्ष देत तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम आज पर्यंत  आठवले साहेबांनी केले आहे. याची पोचपावती म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शाखेचे बोर्ड आपणास पाहायला मिळतात. 
या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या जीवावर आपली ताकद सिद्ध करून केंद्रातून सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पद आणण्यात आठवले साहेब मात्र यशस्वी ठरले आहेत त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच आनंद उत्साह पाहायला मिळत आहे. 
पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांना कडून साहेबांना शुभेच्छा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments