प्रतिनिधि. नौशाद सय्यद
अनधिकृत बांधकाम बद्दल पाचगणी नगर पालिका कोम्यात
काही महिन्यापूर्वी मा . जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र डुडी यांच्या आदेशा नुसार महाबळेश्वर तालुक्या मध्ये अनेक मोठी कारवाई करण्यात आली जे सी बी च्या साह्याने भले मोठे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले. परंतु महाबळेश्वर तालुक्या मध्ये अनधिकृत बांधकाम थांबण्याचे नाव घेत नाही.
पाचगणी नगरपालिका हद्दी मध्ये लिज प्रॉपर्टी नगर परिषदेच्या 50 ते 60 पावलावर असून देखील त्या लीस प्रॉपर्टी मध्ये कितीतरी बांधकाम चालू आहे पाचगणी नगरपालिकेला हे सर्व बांधकाम चालू असताना दिसत नाही का?
अनेक झाडे तोडले जातात , पाचगणी नगरपरिषद कोम्यात आहे का ? अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.
झोपलेल्या माणसाला उठवणे सोपे असते, परंतु झोपेचा सोंग करणाऱ्याला उठवणे कठीण असते.
हीच परिस्थिती पाचगणी नगरपालिकेची झालेली आहे असे दिसून येते.
0 Comments