Header Ads Widget

नागेवाडी धरण भरले, बावधन भागाचा पाणी प्रश्न मिटला.

वाई प्रतिनिधि - दिलीप कांबळे 


 बावधन व बारा वाड्या परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारे नागेवाडी धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवार दिनांक 13 रोजी मुख्य सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले गेल्या वर्षी नागेवाडी धरण भरले नव्हते त्यामुळे उन्हाळ्यात पाणी तळाला गेले होते गाळ मिश्रित पाणी शिल्लक होते त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भाषणाची शक्यता निर्माण झाली पण सुदैवाने प्रश्न भेडसावला नाही यंदा सलग काही दिवस पाऊस झाल्याने शेती चांगली हिरवीगार झाली असून सततच्या पावसामुळे नागेवाडी धरण भरल्याचा आनंद व समाधान बावधन व बारा वाड्या परिसरातील ग्रामस्थांना झाला वाई तालुक्याचे भाग्यविधाते आमदार व माजी मंत्री स्वर्गीय मदन रावजी पिसाळ यांचे स्वप्न होते नागेवाडी धरण व्हावे व माझ्या भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी मंत्रालयात वारंवार प्रश्न उपस्थित करून अखेर धरण मंजूर करून घेतले व मुख्यमंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करून धरण बांधून घेतले धरणात पाणीसाठा झाल्याने परिसरात पाझरून ओढ्याला व विहिरींना पाणी वाढू लागले उन्हाळ्यात नागेवाडी व दरेवाडी या डोंगर पायथ्यांच्या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत होता धरण झाल्यानंतर जल स्वराज्य प्रकल्प अंतर्गत बावधन कन्नूर दरेवाडी नागेवाडी या गावांनी धरणाखाली विहिरी काढून पाणी गावात नेले या चारी गावांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला बावधन गाव लोकसंख्येने मोठे असले तरी उन्हाळ्यात योग्य नियोजनामुळे पाणीटंचाई फासली नाही बावधन दरेवाडी नागेवाडी कन्नूर या गावांची पाण्यासाठीची भटकंती कायमची थांबली शेती पाण्यासाठी कॅनलचे काम पूर्ण झाले असून उन्हाळ्यात ज्वारी व उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडले जाते त्यामुळे ओढ्याकडच्या विहिरींना पाणीसाठा होऊन पिके वाचवण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत असे बावधन दरेवाडी कनूर नागेवाडी सह बारा वाड्यांसाठी वरदान ठरणारे नागेवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले. 
 

Post a Comment

0 Comments