पाचगणी नगरीची सुकन्या मा. दशरथ कणवाडीया, व सौ. रूपा कणवाडीया यांची मुलगी कु. दिया दशरथ कणवाडीया यांना एशियन अँड ओसिनिया मार्शल आर्ट सेम्बो चॅम्पियनशिप -२०२४ मध्ये चायना येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीयांसाठी कांस्यपदक मिळवल्या बद्दल त्यांचा सत्कार पाचगणी सिद्धार्थ नगर रहिवाशांकडून विजय रॅली काढून करण्यात आला. यांच्या वाटचालीमध्ये रुरल डेव्हलपमेंट, वूमन इनपावरमेंट एज्युकेशन अँड मेडिकल कॉसेस लालबाग, तसेच सेवानिवृत्त पोलीस उपाआयुक्त विलासजी गंगावणे साहेब यांनी वेळोवेळी हातभार लावला तसेच वेळोवेळी दत्ता भोसले,विकास बगाडे, यांनी सहकार्य केले. या वाटचालीमध्ये आयु. विलासजी गंगावणे व किशोर कांबळे यांच्या माध्यमातून सदभाव फौंडेशनच्या नीता दोशी मॅडम यांच्या कडून चायना येथे पाठवणे करीता मोलाचे योगदान दिले. आई वडिलांनी खूप या यशा करीता श्रम घेतले.
सिद्धार्थ नगर येथे नियोजिकेलेत केलेल्या सत्कार समारंभामध्ये सिद्धार्थ सेवा संघ, तक्षशिला महिला मंडळ, बौद्ध विकास संस्कृतीक मंडळ यांनी अभिनंदन व सत्कार .
0 Comments