Header Ads Widget

पाचगणी,महाबळेश्वरला काँक्रीटच्या जंगलापासून कोण वाचवणार ?

संपादक नौशाद सय्यद 

पाचगणी महाबळेश्वर मध्ये वाढत असलेले काँक्रीटच्या जंगलाला(अनधिकृत बांधकामाला) अखेर थांबवणार तरी कोण ?

पाचगणी महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचे ठिकाण, स्वच्छ आणि सुंदर वातावरण असणार स्थळ, निसर्गाने एक वेगळ्याच कलाकृतीतून घडून आणलेला हा तालुका परंतु आपल्या पुढच्या पिढीला मात्र हे स्थळ याच नैसर्गिक वातावरण व सुंदरते सह पाहायला मिळेल का? 

गेले काही वर्षापासून महाराष्ट्रातील महामार्ग सुरळीत झाल्याने मोठे शहर जसे मुंबई, पुणे येथील लोकांना त्या ठिकाणा वरील गर्मी आणि दगदगी च्या जीवनातून सुट्टी व आराम करण्याचे जवळचे एकमेव ठिकाण म्हणजे पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी जावे व सुट्टी एन्जॉय करावी या हेतूने या ठिकाणी येणारे शहरी लोकानी हळूहळू करत पाचगणी ,महाबळेश्वर मध्ये जागा घेण्यास सुरुवात केली.

  आपण सुट्टी मध्ये येऊन आराम करावा या उद्देशाने  आलेल्या या शहरवासीयांना हळूहळू घेतलेल्या जागेमध्ये इमारत उभी करून या ठिकाणी व्यवसाय करण्याची भुरळ पडली. मात्र या ठिकाणी बांधकाम करणे इतके सोपे नाही हे त्यांच्या लक्षात आले कारण पाचगणी महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी असणाऱ्या जंगली प्राण्यांना संरक्षण तसेच या ठिकाणातील ब्रिटिशकालीन झाडांना संरक्षण मिळण्याकरिता शासनाने या तालुक्याला अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणजेच (ईको सेन्सिटिव्ह झोन) मध्ये समाविष्ट केल्याने या ठिकाणी अवेढव्य बांधकाम करण्यास निर्बंध आहेत.

परंतु निसर्गाशी दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नसणाऱ्या धनदांडग्यानी पैशाच्या जोरावर दोन,तीन वर्षाकरिता आलेल्या  अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्यांना या भूमी बद्दल इथल्या निसर्गाबद्दल काही सुद्धा पडलेले नाही. अशा अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन कडे कपाऱ्यात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून उत्खनन करत भले मोठे इमारती, बंगले उभे केले आहेत. 

पाचगणी महाबळेश्वर भूमिपुत्रांच्या पुढच्या     पिढी ला इथे ना झाडे बघायला मिळतील ना थंड हवामान मिळेल आणि जंगल संपले तर प्राणी जीवन विस्कळीत होईल याचा काडी मात्र विचार न करता आपल्या स्वार्थापायी पुढच्या पिढीला या निसर्ग सौंदर्यापासून वंचित ठेवण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांकडून चालू आहे.

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी यांनी याविषयी कडक भूमिका घेत काही अधिकृत बांधकामावर कारवाई केली पण ही कारवाई बोटावर मोजन्या इतक्या बांधकामावर झाली. 

ज्या वेगाने ही कारवाई करण्यात आले त्याच्या दुप्पट वेगाने अनधिकृत बांधकाम तालुक्यामध्ये झपाट्याने वाढायला लागले. 

नगरपालिका हद्दीमध्ये तर  याहून अधिक बिकट परिस्थिती झाली आहे याला कारण म्हणजे तालुक्यातील दोन्ही नगरपालिके वर प्रशासक असल्याकारणाने मुख्याधिकारी एक हाती निर्णय घेत असल्याने या अनधिकृत बांधकामा मध्ये वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

 प्रश्न विचारण्यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष कोणी नसल्याने

 " हम बोले सो कायदा "

या पॅटर्न ने तालुक्यात काम सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

काही संघटना,पक्ष यांच्याकडून वारंवार या अनाधिकृत बांधकामावर तसेच होणारे नैसर्गिक हानी विरोधात तक्रार करण्यात येतात. जसे काही दिवसांपूर्वी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अशोक (बापू) गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कड्या वरती असणाऱ्या मोठ्या बंगल्यांना त्वरित सील करून त्या ठिकाणी कोणी राहू नये असा आदेश करण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी माळीन गावामध्ये झालेल्या  भूस्खलन (landslide) सारखा प्रकार झाला तर त्या ठिकाणी मनुष्य जीवित हानी होऊ नये असं अर्ज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

असे गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून या धनदांडग्यांन  विरोधात तक्रार ,मोर्चे काढण्यात आले.

 परंतु या  धनदांडग्यांना स्वार्थी अधिकारी नवीन नवीन पळवाटा शोधून देतात आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कायद्याच्या व नियमाच्या रिंगणात गोल फिरवत राहतात.

त्यामुळे हे भारतातील जागतिक पर्यटन स्थळ अजून किती वर्ष आपली जागा राखून ठेवेल हा मोठा प्रश्न आहे ? 

व यामुळे या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांचा फायदा आणि भूमिपुत्रांचे कधी न भरून निघणारे नुकसान होणार हे मात्र नक्की.

 त्यामुळे वाढणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला अखेर कोण थांबवणार ?

Post a Comment

0 Comments