प्रतिनिधी नौशाद सय्यद.
पाचगणी मधील बि.डी सावंत भाजी मार्केट मधील महिला स्वच्छतागृहाचे झालेल्या दुरावस्थे बाबत. आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पाचगणी शहर सचिव प्रीतीताई आब्राळे यांनी पाचगणी नगरपालिकेला निवेदन दिले या निवेदनामध्ये म्हंटले आहे.
पाचगणी मधील मुख्य बाजारपेठेतील बंद अवस्थेत असलेले महिला स्वच्छतागृह त्या ठिकाणी अजिबात स्वच्छता नाही.
त्याचप्रमाणे स्वच्छता गृहाच्या खिडक्या व त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तरी आपण महिलांच्या अडचणी लक्षात घेता स्वच्छता गृहाचे दुरुस्ती करून महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्यात यावे जेणेकरून बाजारपेठेत येणाऱ्या महिलांना या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
0 Comments