काल 19-04-2024 रोजी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे छत्रपती. उदयनराजे भोसले यांनी आपल्या लोकसभा उमेदवारी अर्ज भरला यावेळी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे अनेक आमदारांनी सुद्धा या ठिकाणी आपली वर्णी लावली. फॉर्म भरण्या अगोदर जोरदार रॅली काढत आपले शक्ती प्रदर्शन यावेळी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना फोन केला यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय.राज साहेब ठाकरे, माननीय.जोगेंद्र कवाडे सर, माननिय. महादेव जानकर साहेब, तसेच युतीतील इतर पक्षातील प्रमुखांची फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी सध्या त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता जमणार नाही परंतु प्रचार सभेत आम्ही वेळ काढून नक्की हजेरी लाऊ असे मला सांगण्यात आले आहे. असे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
या सर्वांत आज दिवसभर सातारा शहराचे रस्ते मात्र कार्यकर्तेच्या गर्दीने भरलेल्याचे दिसून आले. या रॅलीमध्ये महाराजांच्या रथयात्रेदरम्यान रथावर मान्यवर आमदार माननीय. शिवेंद्रराजे भोसले तसेच महायुतीच्या घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय.अशोक (बापू) गायकवाड सुद्धा यावेळी या रथयात्रेमध्ये दिसून आले.
0 Comments