Header Ads Widget

छत्रपती. उदयनराजे यांची भाजप कडून उमेदवारी जाहीर.

सातारा प्रतिनिधी. नौशाद सय्यद

साताऱ्या मधून छत्रपती. उदयनराजे यांचे नाव जवळपास निश्चित सांगितले जात होते परंतु अधिकृत घोषणा मात्र झालेली नव्हती. परंतु आता थोड्याच वेळापूर्वी भाजपकडून छत्रपती. उदयनराजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यापूर्वी छत्रपती. उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती तसेच शक्ती प्रदर्शन वेळोवेळी केले होते . मात्र आज भाजपकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यात फक्त एकच नाव जाहीर करण्यात आले ते म्हणजे छत्रपती. उदयनराजे भोसले यांचे.
कदाचित येत्या दोन दिवसा मध्ये छत्रपती.उदयनराजे आपले उमेदवारी भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. या जाहीर झालेल्या उमेदवारी मुळे छत्रपती .उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे . युवा वर्गामध्ये छत्रपती .उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच फॅण बेस आहे. 
या सर्वांत सातारा लोकसभेचे चित्र हे स्पष्ट झालेले आहे. महायुती मधून छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडी मधून मा. शशिकांत शिंदे अशी लढत पूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments