प्रतिनिधी -नौशाद सय्यद
पाचगणी वॉटर सप्लाय चे पाणी पाईपलाईन ओले करण्या पुरतेच?
अलीकडच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा पाचगणी मध्ये वाढत चाललंय आहेत. अश्या परिस्थितीमध्ये पाचगणी वॉटर सप्लाय कडून काही भागात पाणी फक्त पाच ते दहा मिनिटे सोडले जात आहे.
त्यामुळे पाणी जीवनावश्यक असल्याने गरजे पुरता सुद्धा पुरवठा न झाल्याने पाचगणी मधील नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्यातच सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दाब हा सुद्धा कमी असल्याने पुरेसे पाणी मिळणे अशक्य होत आहे. सामान्य जनतेला टँकर मागवणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याने गरीब नागरिकांचे चांगलीच अडचण होत आहे.
अश्या मध्ये पाचगणीतील जुन्या काळी पाचगणी ला पाणी पुरवणार्या ब्रिटिश कालीन विहिरी देखील बंद अवस्थेमध्ये पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नक्की जीवनावश्यक पाणी पाचगणी करांना पुरेसे कसे मिळणार? असा प्रश्न पाचगणीतील नागरिकांसमोर पडला आहे.
0 Comments