प्रतिनिधी नौशाद सय्यद
पाचगणी महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा तापमान वाढल्याने उष्णतेच्या झळा चांगल्याच वाढल्या होत्या मात्र गेल्या दोन दिवसांपासून थोड्या थोड्या पावसाने पाचगणी मधील जमीन सुद्धा वल्ली होत नसल्याचे दृश्य दिसून येत होते परंतु आज दुपारच्या दरम्यान पूर्वेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासोबत पावसाने ढगाच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटामध्ये जोरदार बॅटिंग सुरू केली.
रोज शितडल्या प्रमाणे पडणाऱ्या पावसासारखा हा पाऊस असावा असे सुरुवातीला वाटली तरी या पावसाने मुसळधार वेग धरल्याने पाचगणी मधील नाले भरून वाहू लागले. या पावसामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पाचगणी मधील तापमान कमी होण्यात मदत मिळेल हे नक्की.
0 Comments