Header Ads Widget

पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविण्यात आले महास्वच्छता अभियान.

संपादक- नौशाद सय्यद 

माननिय मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या संकल्पनेतुन  व माननिय गट विकास अधिकारी पंचायत सामिती महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक आरोग्य केंद्र पांचगणी व केंद्रा अंतर्गत येणाऱ्या 28 गावामध्ये महास्वचछता अभियान व कंटेनर सर्व्हक्षण राबविण्यात आले व प्रत्येक गावात दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान करण्यात आले. डेंग्यू हिवताप चिकुणगुण्या इत्यादी किटकजन्य आजाराची जनजागृती करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉॅ बुलाख (सर), वैद्यकिय अधिकारी डॉ अजित कदम (सर), डॉ गोळे (मॅडम), विस्तार अधिकारी पराडके (सर), गणेश सपकाळ इत्यादी उपस्थित होते यावेळी 28 गावातील आशा कार्यकर्ती व प्राथमिक आरोग्य केद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments