Header Ads Widget

सिल्वर ओक झाडे ही पांचगणीची नैसर्गिक सुंदरता.

संस्थापक अध्यक्ष -नौशाद सय्यद

पाचगणी पर्यटन स्थळ याची सुंदरता सिल्वर ओक रोप या झाडां मध्ये आहे .
सिल्वर रोप अनेक ठिकाणी लावले जातात परंतु पाचगणीच्या हवामाना मध्ये शंभर ते दीडशे फूट या उंची मध्ये येतात परंतु अनेक ठिकाणी हे झाड लावल्याने पाचगणी च्या मर्यादित जेवढी उंची पाचगणी पर्यटन स्थळां मध्ये येते कोठे देखील दिसत नाही.
या झाडांची लागवड सुमारे दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी केली होती. 
 बाजूलाच 18 किलोमीटर महाबळेश्वर पर्यटन स्थळ येथे देखील पाचगणीच्या प्रमाणे सिल्वर रोप ची सुंदरता नाही.
 ही सुंदरता फक्त पाचगणी पर्यटन स्थळाला निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे. ही सुंदरता जपणे जसे पाचगणीतील नागरिकांचे कर्तव्य आहे तसेच याची निघा राखण्याचे काम शासकीय अधिकारी यांचे सुद्धा असताना याकडे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. 
 पाऊस,वारा अधिक असल्यामुळे ही झाडे पावसामध्ये अधिक प्रमाणामध्ये पडत असल्याचे दिसून आलेले आहे.
 व त्या झाडाची उंची 100 ते 150 फूट असल्यामुळे प्रशासनाकडून झाडावरचा बोजा कमी करण्याची गरज आहे. म्हणजे पावसामध्ये या झाडांकडे वाढलेल्या फांद्या कमी करण्याची गरज आहे.
 त्यामुळे पाऊस वाऱ्या मध्ये हे झाडे पडण्याची शक्यता कमी होईल. असे नागरिकांचे म्हणणे आहे पाचगणीचे निसर्ग जपण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments