Header Ads Widget

नागेवाडी लिंब मधील बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या खाणी तात्काळ सील करून सर्कल आणि तलाठी यांना निलंबित करा: किरण बगाडे.

प्रतिनिधी , नौशाद सय्यद


गौण खनिज अधिकारी श्री. थोरात यांना किरण बगाडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी*
उपरोक्त वरील विषयांवरून लिंब व नागेवाडी ता. सातारा या हद्दीमध्ये खान व क्रशर धारकांनी अक्षरशः महसूल प्रशासनाच्या व नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे नागेवाडी लिंब हद्दीमध्ये प्लॉट नं.2 संजय माने प्लॉट नं.3 शाकीर भाई शेख,प्लॉट नं 4.कुऱ्हाडे, प्लॉट नं.7 पी व्ही सावंत,प्लॉट नं.12 श्री गणेश कन्ट्रक्शण, प्लॉट नं.15. गिजरे/ रवींद्र माने, या वरीलप्रमाणे प्लॉट मध्ये अनधिकृत राजरोसपणे 1 वर्षापासून उत्खनन सुरू आहे त्या प्लॉट नंबर चा ईटीसी मोजणी अहवाल याचा खुलासा करावा तसेच डे टू डे किती ब्रास उत्खनन झाले त्याचा सर्कल व तलाठी यांचा पाहणी अहवाल याची चौकशी करावी तरी ETC मोजणी धारकला manej केले की काय ?तरी श्री माने यांनी प्लॉट नं.15 मधील झालेल्या अनधिकृत बेसुमार उत्खननावर पडदा टाकण्यासाठी साई सेवा सोसायटी च्या नावाने परमिट घेवून महसूल प्रशासनाच्या डोळयात धूळ फेकली आहे तरी त्या साई सेवा सोसायटी च्या परमिट ची चौकशी करावी कोणत्या निकषाखाली परमिट घेतले ? सदर वरील प्लॉट धारकांनी एका वर्षभरात लाखो ब्रास अनधिकृत बेकायदेशररित्या उत्खनन केलेले आहे तरी सर्व प्लॉट नं.ची त्रयस्थ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून त्या झालेल्या ब्रासच्या उत्खननावर रॉयल्टी सदर निश्चित करून त्याच्या पाचपट दंड रक्कम सदर प्लॉट धारकांकडून शासनाला भरणा करण्यात यावी सदर उत्खननामध्ये आज अखेर कारवाई होण्यापेक्षा नेमके पाणी कुठे मुरले?हा प्रश्न उपस्थित होत आहे तरी सदर बाब गंभीर असून सदर प्लॉट धारकांनी करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवला असून त्यांना खाण धारकांना स्व:स्वर्थासाठी पाठीशी घालणाऱ्या सर्कल श्री कुलकर्णी व तलाठी यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी करून यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार

Post a Comment

0 Comments